प्रेम इतके अवघड असतं
समजायला. उमजायला. व्यक्त करायला
असं नक्की काय असतं त्यात
कि लागते ती इतकी आवडायला
चार दोन मोकळ्या गप्पा. जुळते सूर
पुढची भेट कधी वाटणारी हुरहूर
नंतर मग नुसतं डोळ्यांनी बोलण
या मनीच त्या मनी. कोण्या जन्मीच देण
काही न घेता तिला देण्याची आस
बाकी काही नको. फक्त तू अशीच हास
निस्वार्थी. निरागस. निर्मळ असं प्रेम हवं
प्रेमात पाडाव आणि फक्त ते अनुभवाव....❤️